प्रार्थना (केवलं कंठस्थिकरणार्थम)

करदर्शनम् - कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती । करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम् ।।


भाषांतर : तळहाताच्या टोकावर लक्ष्मी राहते . हाताच्या मध्यभागी सरस्वती वास करते . तळहाताच्या मुळाशी ( मनगटावर ) श्रीकृष्ण परमात्मा राहतो . म्हणून सकाळी ( जाग आल्यावर प्रथम ) हाताचे दर्शन घ्यावे.  

Translation: Lakshmi stays on the tip of the palm.  Saraswati smells in the middle of the hand.  Lord Krishna resides at the base of the palm (on the wrist).  So in the morning (first thing when you wake up) you should take darshan of hand   


क्षमाप्रार्थना - समुद्रवसने देवि पर्वतावलिभूषिते । विष्णुपनि नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे ॥


भाषांतर : समुद्ररूपी वस्त्र नेसलेल्या , पर्वतांच्या रांगांनी सुशोभित झालेल्या , विष्णूची पत्नी असलेल्या हे ( पृथ्वी ) देवी , तुला नमस्कार असो . माझ्या पावलांचा स्पर्श झाल्याबद्दल ( तुला पाय लागल्याबद्दल ) क्षमा कर .

Translation: Greetings to this (earth) goddess, who is the wife of Vishnu, adorned with mountain-like garments, adorned with mountain ranges.  Forgive me for touching my feet.


सूर्यनमस्कार : -ध्येयः सदा सवितृमण्डलमध्यवर्ती नारायण : सरसिजासनसन्निविष्टः । केयूरवान् मकरकुण्डलवान् किरीटी हारी      हिरण्मयवपुर्धतशङ्खचक्रः ।।

भाषांतर : सूर्यबिंबाच्या मध्यभागी कमळाच्या आसनावर बसलेल्या , सोन्यासारखे तेजस्वी शरीर असलेल्या , मुकुट , हार , बाहुभूषणे आणि मकरकुंडले घातलेल्या व शंख , चक्र धारण केलेल्या नारायणाचे नेहमी ध्यान करावे .

Translation: One should always meditate on Narayana, who is seated on a lotus seat in the center of the sun, with a body as bright as gold, wearing crowns, necklaces, bracelets and crocodiles, and holding conch shells.


 भोजनमन्त्रः- सततमशनकाले मातृभूमिं स्मरेयम् जय जय जननि त्वं मुक्तकण्ठं वदेयम् । हितदसुखदमन्नं प्रत्यहं भक्षयेयम् भवतु बलसमृद्ध राष्ट्रभक्त्यै शरीरम् ।।

भाषांतर : भोजनसमयी नेहमी मी मातृभूमीचे स्मरण ठेवीन . ' आई तुझा जयजयकार असो ' असे मुक्तकंठाने मी म्हणेन . दररोज हितकारक आणि सुखदायक अन्न मी खाईन . राष्ट्राची सेवा करण्यासाठी माझे शरीर बलशाली होवो .

Translation: I will always remember my motherland at meal time.  I will freely say, 'Mother, I applaud you.'  I will eat good and pleasant food every day.  May my body be strong to serve the nation.


 दीपस्तुतिः - दीपज्योतिः परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः । दीपो हरति पापानि सन्ध्यादीप नमोऽस्तुते ।। 

भाषांतर : दीपज्योती हे परब्रह्म आहे , विष्णूचे रूप आहे . दीप पापे नाहीशी करतो . हे संध्यादीपा , तुला नमस्कार असो . 

Translation: Deepajyoti is Parabrahm, the form of Vishnu.  Deep eliminates sins.  Hello Sandhyadeepa.


शान्तिमन्त्रः -ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते । पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ।।

भाषांतर : ते ( परब्रह्म ) पूर्ण आहे . त्यातूनच हे ( जग ) पूर्ण निर्माण झालेले आहे . पूर्णातून पूर्ण काढले तरी पूर्णच शिल्लक राहते .

Translation: It (Parabrahm) is complete.  That is why this (world) is completely created.  Even if the whole is removed from the whole, the whole remains.


Subscribe My Youtube Channel: http://www.youtube.com/c/AmodSanskrit

10th Sanskrit Prarthana : https://youtu.be/aVEJk7cZ26I


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Avaymala , Standard 9th , Amod Sanskrit

Suktisudha , Standard 9th , amod sanskrit